PM Daksh Yojana 2024 । पीएम दक्ष योजना नक्की काय आहे ? जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, करा ऑनलाइन अर्ज

PM Daksh Yojana 2024 केंद्र सरकार नवीन नवीन योजना या भारतातील नागरिकांसाठी काढत असतात. अशीच एक योजना म्हणजे पीएम दक्ष योजना या योजने अंतर्गत भारतामधील तरुण वर्गातील नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात प्रशिक्षण देऊन. त्यांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देणे हा या योजने मागचा खरा उद्देश आहे.या योजने मार्फत जे भारतामधील गरीब वर्गातील विद्यार्थी समूह आहे आणि कचरा काढणारे कामगार अश्या मुलांना शिकण्याची भरपूर आवड असते.या योजने मार्फत या वर्गातील समूहांना सुद्धा शिक्षण करण्यामध्ये फायदा होणार आहे आणि ही सरकारची योजना असल्यामुळे त्या सर्टिफिकेट चा उपयोग चांगल्या प्रकारे होईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या योजनेमध्ये प्रोफेशनल पद्धतीने उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये ओबीसी,एससी,ईव्हीएस डीएनटी,सफाई कामगारांचे विद्यार्थी अशा सर्व जाती धर्मातील मुलांना यामध्ये अर्ज करता येणार आहे.त्यामुळे आपल्या येतील जे मित्रमंडळी असतील त्यांना ही माहिती पाठवणे. सोशल जस्टीस अँड एम्पॉवरमेंट यांच्याकडून ही योजना पार पडण्यात येणार आहे. सगळे शिकवल्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून सपोर्ट सुद्धा मिळणार आहे.

PM Daksh Yojana 2024

पीएम दक्ष योजना योजना प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केले.या योजनेमार्फत अधिकाधिक मुलांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवले जाते हा या मागचा खरा उद्देश असणार आहे. या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा,याचा फायदा व उद्देश काय असणार आहे. यासाठी अर्ज कसा भरायचा, पात्रता का असणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण माहिती द्वारे पाहणार आहोत.त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि आपल्या मित्रमंडळी यांना शेअर करावे.

योजनेचे संपूर्ण नावPM Daksh Yojana 2024
योजनेची सुरुवात कोणी केलीभारत सरकार (केंद्र सरकार)
लाभ कोणाला मिळणारभारता मधील आर्थिक गरज असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण.
उद्देश काय आहेभारतामधील विद्यार्थी उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे.
सुरुवात कधी करणार2024
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
PM Daksh Yojana 2024
PM Daksh Yojana 2024

PM Daksh Yojana 2024 चा उद्देश

दक्ष योजना अंतर्गत भारतामधील मागासवर्गीय जाती मधील विद्यार्थी समूह,अनुसूचित जाती जमाती,ओबीसी,एसी,इव्हीएस,डीएनटी अशा उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मागचा खरा उद्देश असणार आहे.यामध्ये तुम्हाला मोफत शिक्षणाचे प्रशिक्षण हे सरकार द्वारा दिले जाणार आहे. यामधील प्रशिक्षण हे नवीन काळातील सर्व गोष्टींवर असणार आहे. योजने अंतर्गत तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आणि स्किल डेव्हलपमेंट कसे करायचे याबद्दल प्रशिक्षण दिले जाणार आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त दोन लाख सात हजार तरुणांना प्रशिक्षण देणार आहे. या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करून शिकू शकते यामुळे तुम्ही बाकीचे सर्व कामे सुद्धा करू शकतील.

  1. महिला वर्गातील विद्यार्थी नागरिक सुद्धा शिकून पुढे जाऊ शकतील स्वतःच्या उभे राहू शकतील.
  2. पीएम दक्ष योजने मुळे भारतामधील अनेक विद्यार्थी नवीन नवीन स्किल,पर्सनल डेव्हलपमेंट अशा मॉडर्न पद्धतीमधील शिक्षण शिकू शकतील.
  3. या योजने मुळे अधिक रोजगार संपन्न होतील आणि विद्यार्थी हे नोकरी क्षेत्रातही चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतील.
👉 PM Vishwakarma Yojana 2024 । व्यवसाय करायचाय ? कर्ज हवंय, जाणून घ्या विश्वकर्मा योजनेबद्दल संपूर्ण माहिती इथे

PM Daksh Yojana 2024 चा फायदा आणि लाभ

भारत सरकारने या योजने विषयी काही लाभ आणि फायदे सांगितले आहेत. ते तुम्ही पूर्णपणे वाचणे गरजेचे आहे.त्यामुळे या योजने बद्दल अजून माहिती तुम्हाला मिळेल.

  • सर्वात पहिले पीएम दक्ष योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण हे विद्यार्थी उमेदवारांना दिले जाणारे.
  • प्रशिक्षण दिले झाल्यानंतर तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
  • पीएम दक्ष योजना ही 2021 पासून ते 2024 पर्यंत चालू आहे आणि या योजने मध्ये जास्तीत 2.7 लाख तरुण विद्यार्थ्यांना दरवर्षी या मध्ये मोफत स्वरूपात प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.
  • यामध्ये जे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्या प्रशिक्षणामधील शिक्षक वर्ग सुद्धा चांगल्या प्रकारे निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रशिक्षणामध्ये सर्व गोष्टी तुम्हाला नवीन युगा प्रमाणे शिकवल्या जाणार आहेत.
  • या योजने अंतर्गत सरकार कडून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे.याचा फायदा नोकरी करण्यासाठी सुद्धा फायदा होणार आहे.
  • योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही ऑनलाईन पद्धतीने याचा अर्ज हा करायचा असणार आहे.
  • यामध्ये पाच प्रकारे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यांचा कालावधी हा वेगळा असणार आहे या कालावधीची माहिती तुम्हाला पुढे पीडीएफ द्वारे दाखवण्यात येणार आहे.त्यामुळे तुमच्या वेळेनुसार तुम्ही या योजने मध्ये सहभाग घेऊ शकता. PM Daksh Yojana 2024

PM Daksh Yojana 2024 साठी लागणारी पात्रता

  1. सर्वात प्रथम यामधील विद्यार्थी वर्गातील उमेदवार हा भारत देशाचा नागरिक असणे गरजेचे असणार आहे.
  2. यामधील विद्यार्थी उमेदवाराचे वय हे 18 ते 45 वर्षे वर्गातील असणे गरजेचे आहे.
  3. या योजनेमध्ये ओबीसी आणि ईव्हीएस विद्यार्थी या कुटुंबातील उमेदवार हा अर्ज करणार असल्यास वार्षिक उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
  4. यामध्ये विद्यार्थी उमेदवाराचे आधार कार्ड बँकेची लिंक असणे गरजेचे असणार आहे.व सगळे कागदपत्रे योग्य स्वरूपात असणे गरजेचे आहे.

PM Daksh Yojana 2024 साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

या योजनेमध्ये भारत सरकारने काही कागदपत्रे सांगितले आहे ती पुढील प्रमाणे असणे गरजेचे असणार आहे.

  • आधार कार्ड, पॅन कार्ड
  • बँक पासबुक.
  • निवासी प्रमाणपत्र
  • दोन पासपोर्ट साईज फोटो.
  • फोन नंबर.
👉 Lakhpati Didi Yojana 2024 | नक्की काय आहे लखपती दीदी योजना?, जाणून घ्या संपूर्ण माहिती इथे, महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंतची मदत

PM Daksh Yojana 2024 Apply Online

  1. सगळ्यात पहिला आपल्याला सरकारने दिलेला अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे.त्यामध्ये रजिस्टर करून घ्यायचे आहे.
  2. ते सगळे झाल्यानंतर ना तुम्हाला पुढे होम पेजवर कॅंडिडेट रजिस्ट्रेशन असे ऑप्शन येणार आहे या ऑप्शन वर क्लिक करावे.
  3. त्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती नाव, पत्ता,कुठे राहता,जन्माची तारीख,जिल्हा, शिक्षणाचे पात्रता असे अनेक अनेक पर्याय तुम्ही बघून भरावे.
  4. फोटो अपलोड करून सगळ्या माहिती तुम्ही वाचून त्याची प्रिंट काढावी आणि आपल्याकडे ठेवावे.
  5. सगळ्यात शेवटी तुम्हाला इंटरव्यू साठी असाच अर्ज हा भरायचा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, नाव हे भरायचे आहे.
  6. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची प्रिंट मारून तुमच्याकडे ठेवावी.
  7. सर्व झाल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी द्वारे किंवा अधिकृत वेबसाईटवर कळवले जाणार आहे. PM Daksh Yojana 2024
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करणे
पीडीएफ (PDF)येथे क्लिक करणे

पीएम दक्ष योजनेमध्ये अर्ज कोणत्या स्वरूपात करायचा?

या योजनेमध्ये अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

पीएम दक्ष योजनेचा फुल फॉर्म काय आहे?

प्रधानमंत्री दक्षता और कौशलता सन्मान हितग्रही हा योजना चा फुल फॉर्म आहे.

पीएम दक्ष योजनेमध्ये कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले जाणार आहे?

यामध्ये अनुसूचित जाती जमाती,ओबीसी, एस सी एस,ई बी एस सी, आणि सफाई कामगारातील विद्यार्थ्यांना यामध्ये प्रमुख लक्ष दिले जाणार आहे.

Leave a Comment